कोरोना नसतानाही दिला पॉझिटिव्ह रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:46+5:302020-12-30T04:28:46+5:30
खोकराळे यांचे वडील बबनराव नारायण खोकराळे हे शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यूक्लेस हॉस्पिटलमध्ये १४ ते १८ ऑगस्टदरम्यान ॲडमिट होते. १६ ...
खोकराळे यांचे वडील बबनराव नारायण खोकराळे हे शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यूक्लेस हॉस्पिटलमध्ये १४ ते १८ ऑगस्टदरम्यान ॲडमिट होते. १६ ऑगस्ट रोजी बबनराव यांना कोरोना झाला असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांना सांगितले, तसेच त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी बबनराव यांचे निधन झाले असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टर गोपाळ बहुरूपी यांनी सांगितले. त्यानंतर अशोक खोकराळे यांनी त्यांच्या वडिलांवर झालेली ट्रीटमेंट व बिले न्यूक्लेस हॉस्पिटलमधून घेतले. हॉस्पिटलमध्ये बबनराव यांच्यावर झालेल्या उपचाराबाबत संशय आल्याने खोकराळे व त्यांच्या नातेवाइकांनी अधिक चाैकशी केली. यावेळी क्रस्ना डिग्नोसिस लॅबने बबनराव यांचे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दोन बनावट रिपोर्ट दिले असल्याचे समोर आले. याबाबत खोकराळे यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्रयालय व येथील महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी आयुक्तांनी सुनावणी घेतली. त्यानंतर खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लॅबचे अधिकारी, टेक्निशिअन व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.