कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ; १०० बेडचे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:23+5:302021-05-26T04:21:23+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येते आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्यावतीने तयारी करण्यात येते आहे. नगर ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येते आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्यावतीने तयारी करण्यात येते आहे. नगर परिषदेच्या प्रांगणातील कुटीर रुग्णालयात ७० बेड असून त्यात २८ बेड हे ऑक्सिजनचे आहेत. येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करता रुग्णालयाचा विस्तार करत बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यात सर्वाधिक ८० बेड हे ऑक्सिजनचे असतील. तसेच रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे. काेरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रभावी उपाययोजना करण्यात येते आहे. या रुग्णालयासाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी एकत्र येऊन नवीन पद्धतीचे ३० बेड देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.
------------
सीएसआर फंडातून भरीव मदत करावी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून संगमनेर नगर परिषदेच्यावतीने प्रभावी उपाययोजना करण्यात येते आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, बेड, औषधे यासाठी संस्था, बँका, पतसंस्था आदींनी आपल्या सीएसआर फंडातून भरीव मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री यांनी केले आहे.
----------
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून कुटीर रुग्णालयात शंभर बेडचे अद्ययावत रुग्णालय आठ दिवसात सुरू करण्यात येते आहे. त्यात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजनचे असतील. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मास्क वापरणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे.
डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगर परिषद