मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची झाकली मूठ

By मिलिंदकुमार साळवे | Published: November 28, 2018 03:49 PM2018-11-28T15:49:53+5:302018-11-28T15:50:33+5:30

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

Post-Matriculation Scholarship | मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची झाकली मूठ

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची झाकली मूठ

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीची अवस्था ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी झाली आहे. त्यामुळे २०१८-१९ चे प्रथम सत्र संपून गेल्यानंतरही गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीधारकांची माहिती सामाजिक न्याय विभागाकडे संकलित होऊ शकलेली नाही.
गेल्यावर्षी सर्व्हर व रेंज अशा संगणकीय गोंधळामुळे आॅनलाइन प्रणालीचा फज्जा उडाला. त्यामुळे गेल्यावर्षी अनेक विद्यार्थी अर्ज भरूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना यावर्षी आॅफलाइन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महाविद्यालय स्तरावरच हे अर्ज सादर केले जात आहेत. यंदाचे निम्मे शैक्षणिक वर्ष उलटून गेल्यानंतरही महाविद्यालयांकडून संकलित माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जातनिहाय वर्गवारीनुसार किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, किती जणांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले, किती जणांना शिष्यवृत्ती मंजूर झाली? याची माहिती संकलित होऊ शकलेली नाही. दरम्यान २०१८-१९ मध्ये शिष्यवृत्तीसाठी ३९ कोटी रूपयांची पुरवणी मागणी विभागामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. १८-१९ या शैक्षणिक वर्षात मात्र सर्व शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार महाविद्यालय स्तरावर ५३५६ अर्ज प्रलंबित आहेत.

२०११-१२ ते २०१७-१८पर्यंतची स्थिती
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहावीपुढील शिक्षणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. वार्षिक २ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाºया पाल्यांच्या पालकांना फ्रिशीप दिली जाते. २०११-१२ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १५ हजार १२८ व फ्रिशीपसाठी १४७० अर्ज दाखल होते. त्यातील शिष्यवृत्तीचे १४६२६ व फ्रिशीपचे १३९० अर्ज निकाली काढले. १२-१३ मध्ये शिष्यवृत्तीचे १६५५४ व फ्रिशीपचे १८२४ अर्ज दाखल होते. यापैकी १५३८५ व १७११ अर्ज निकाली काढले. २०१५-१६ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १९१३१, फ्रिशीपसाठी २१३४ अर्ज आले असताना यातील १७९९० व १९३२ अर्ज निकाली निघाले. २०१६-१७मध्ये शिष्यवृत्तीसाठी १८९५४ व फ्रिशीपसाठी २०५९ अर्ज आले होते. यापैकी १७३२४ व १८७६ अर्ज निकाली निघाले. २०१७-१८ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १४९६९ व फ्रिशीपसाठी १५६७ अर्ज आॅनलाइन दाखल झाले होते. यापैकी १३९२३ व १४५० अर्ज निकाली काढण्यात आले.

 

Web Title: Post-Matriculation Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.