श्रीरामपुरातील टपाल कर्मचा-यांनी केले मुंडण :आंदोलनाच्या १४ वा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:31 PM2018-06-05T16:31:34+5:302018-06-05T16:31:46+5:30
संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला.
श्रीरामपूर : संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला.
या कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी व सेवकांना टपाल खात्यात नोकरीत सामावून घ्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी २२ मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
येथील मुख्य कार्यालयासमोर कर्मचा-यांनी निदर्शने करत धरणे आंदोलन केले. प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मात्र सोमवारी संतापलेल्या १४ कर्मचाºयांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला.
यात संघटनेचे सचिव एन.पी.जाधव, रमेश बोºहाडे, संदिप जाधव, अकबर शेख, जे.एल.भालेकर, भास्कर नवले, ज्ञानदेव मोरे, राजू फुलपगार, संतोष सोमवंशी, रावसाहेब वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, जालिंदर चव्हाण, किशोर चव्हाण, हरिभाऊ पवार, इलियास शेख, एकनाथ ठाकरे आदी सहभागी झाले होते.