रविवारी देखील राखी वाटपासाठी पोस्टमन कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:53+5:302021-08-24T04:25:53+5:30

अहमदनगर : बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे राखी. दरवर्षी रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. ...

Postman also on duty for rakhi distribution on Sunday | रविवारी देखील राखी वाटपासाठी पोस्टमन कर्तव्यावर

रविवारी देखील राखी वाटपासाठी पोस्टमन कर्तव्यावर

अहमदनगर : बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे राखी. दरवर्षी रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी नेमका रविवारी आला. त्यामुळे बहिणीने पाठवलेल्या राख्या भावापर्यंत वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी पोस्ट खात्यावर आली. ती जबाबदारी पोस्टाने उत्तमपणे निभावल्याने बहीण-भावांचा आनंदाला पारावार राहिला नाही.

शनिवारपर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या सर्व राख्या पोहचविण्यात आल्या होत्या. परंतु रविवारी साप्ताहिक सुट्टी असून देखील पोस्ट खात्याने आलेल्या सर्व राख्या पोहविण्याची जबाबदारी पार पाडली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोस्टमन हे रविवारी कर्तव्यावर होते. पोस्ट ऑफिसमध्ये आलेले सर्व राखी टपाल त्यांनी वितरित केले. जेणेकरून बहिणीने पाठविलेली राखी भावापर्यंत सणादिवशी मिळेल. जर रविवारी या राख्या वितरित केल्या नसत्या तर त्या राख्या सोमवारी द्याव्या लागल्या असत्या. परंतु रक्षाबंधनाचे महत्त्व निघून गेले असते, ही भावनिक बाब लक्षात घेऊन रक्षाबंधन सणाच्या दिवशीच सर्व राख्या पोहोचवण्याची जबाबदारी पोस्ट खात्याने पार पाडली. एसटी महामंडळाने देखील टपाल बॅगांची वाहतूक रविवारी केली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये टपाल पोहोचवता आले. याबद्दल पोस्ट खात्याच्या पुणे क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल मधुमिता दास व अहमदनगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. राम कृष्णा यांनी सर्व पोस्टमन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जिल्ह्यामध्ये रविवारी टपाल वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती व त्यानुसार सुमारे ३००० राख्यांचे वाटप रविवारी करण्यात आले, अशी माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली.

------------

फोटो - २३पोस्ट

रविवारी सुटीचा दिवस असूनही पोस्टमन कर्मचाऱ्यांनी पोस्टात आलेल्या राख्या संबंधितांना पोहोच केल्या.

Web Title: Postman also on duty for rakhi distribution on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.