कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:12 PM2018-10-24T18:12:32+5:302018-10-24T18:12:35+5:30
कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे.
मिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.
तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.
दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.
कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.