विद्युत तारांमुळे निर्मलनगरकरांच्या जीविताला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:47+5:302021-03-22T04:19:47+5:30
अहमदनगर : येथील निर्मलनगर परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणाऱ्या विद्युत तारा कमालीच्या खाली आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होऊ ...
अहमदनगर : येथील निर्मलनगर परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणाऱ्या विद्युत तारा कमालीच्या खाली आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे या तारा तातडीने हटविण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे.
निर्मलनगर येथील गाडेकर चौकाच्या परिसरात विद्युत रोहित्र आहे. तेथून विद्युत तारा पुढे नेण्यात आलेल्या आहेत. या तारा शनिवारी (दि. २०) अचानक खाली आल्या. दरम्यान, नागरिकांनी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याशी संपर्क साधला असता वारे यांनी परिसराची पाहणी केली. तसेच महावितरणच्या फकीरवाडा येथील उपअभियंत्यांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी वारे म्हणाले, या भागात मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काळामध्ये महावितरणने विद्युत तारा व पोल बसविले. या भागातील लोकवस्ती वाढली असून, तारांचे मोठे जाळे तयार झालेले आहे. शॉर्टसर्किट होऊन तारा खाली सरकत आहेत. यामुळे या भागातील नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून राहत आहेत. सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने खांब पडण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील विद्युत तारा हटवाव्यात, अशी मागणी यावेळी वारे यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
...
फोटो- २१ निखिल वारे