शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:35+5:302021-03-25T04:20:35+5:30

यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, राज्याचे महासचिव भगवानराव ज-हाड, ...

Power supply to farmers should be streamlined, otherwise statewide agitation | शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन

यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, राज्याचे महासचिव भगवानराव ज-हाड, प्रदेश कोषाध्यक्ष प्रकाश थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे संकट व त्यामुळे पडलेले बाजारभाव, सर्वत्र झालेली अतिवृष्टी, सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत आदींमुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने कृषीपंपांच्या वीजबिलवसुलीचा लावलेला तगादा आणि त्यासाठी वीज बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्याने शेतक-यांची उभी पिके होरपळून चालली आहेत. त्यामुळे ही वसुली थांबवून शेतकऱ्यांची वीज बंद करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या मागणीसंदर्भात नगर तहसील कार्यालयात पक्षाचे महासचिव भगवानराव ज-हाड, जिल्हा सल्लागार अशोकराव होनमाने, जिल्हाध्यक्ष दक्षिण महेंद्र सोलाट, उद्योग आघाडीचे सचिन थोरात, मुख्य संघटक विजय कुटे-पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Power supply to farmers should be streamlined, otherwise statewide agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.