नेवाशात १५ ठिकाणी वीज चोरीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:58+5:302021-09-23T04:23:58+5:30
नेवासा : शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत वीज ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीजचोरी ...
नेवासा : शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत वीज ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीजचोरी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात शहरात वीजचोरी करणाऱ्या १५ ठिकाणी कारवाई करीत १३ हजार ५६८ युनिटचा तब्बल २ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड आकारणी केली. तसेच ५९ हजार रुपयांची तडजोड आकारणीही करण्यात आली.
महावितरणच्या कारवाईमुळे शहरात वीज चोरांचे धाबे दणाणले असून, अधिकृत व नियमित वीज बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वीजचोरी शोधमोहिमेसाठी ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा उपविभाग उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहायक अभियंता मनोहर पाटील, सहायक अभियंता राकेश भंगाळे, निम्नस्तर लिपिक मेहुल बोर्डे, नेवासा शहर कक्ष लाईनस्टाफ, आदींनी मोहिमेत सहभाग घेतला.