डाऊच खुर्द परिसरातील विद्युत ट्रान्सफार्मर पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:53+5:302021-03-10T04:22:53+5:30
सुमारे पंचवीस ते ३० फूट उंची एवढे आगीचे लोळ आकाशात दिसल्याची माहिती रात्री पिकांना पाणी भरणाऱ्या प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिली. ...
सुमारे पंचवीस ते ३० फूट उंची एवढे आगीचे लोळ आकाशात दिसल्याची माहिती रात्री पिकांना पाणी भरणाऱ्या प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिली.
अचानक पेटलेला ट्रान्सफार्मर पहाता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
यावेळी प्रसंग सावधानता राखून पंकज पुंगळ व उपस्थित शेतकऱ्यांनी लगेच विद्युत कंपनी कर्मचाऱ्यांना फोन केला. कर्मचारी संतोष पवार हे घटनास्थळी हजर झाले व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ८ मार्च रोजी सकाळी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सोमनाथ निरगुडे, संतोष पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी पंकज पुंगळ, गणेश बढे, किसन बारसे, विरु बढे, सकाहरी बढे, चिलु गुरसळ, प्रभाकर अंबिलवा, बाळु गायकवाड, सचिन बारसे, राजू पगारे, सोमनाथ बढे, दामाभाऊ बारसे, संजु बारसे ,एकनाथ बारसे आदी उपस्थित होते.