प्रहारचे कार्यकर्ते रुग्णसेवेसाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:14+5:302021-05-07T04:22:14+5:30
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे औरंगाबाद रोडवर (शेंडीजवळ) प्रहार अकॅडमीमध्ये बुधवारी मोफत कोरोना सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन झाले. त्यावेळी मंत्री कडू यांनी ...
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे औरंगाबाद रोडवर (शेंडीजवळ) प्रहार अकॅडमीमध्ये बुधवारी मोफत कोरोना सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन झाले. त्यावेळी मंत्री कडू यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
मंत्री कडू म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात लोकांसाठी धावून जावे. अशा काळात केलेली मदत नक्की उपयोगी ठरेल. उपचार किंवा इतर मदतीसाठी अडलेल्या लोकांना सहकार्य करा. प्रहार संघटनेचा हाच उद्देश आहे. नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते नेहमीच चांगल्या कामासाठी पुढे असतात. त्यामुळे या काळातही ते उत्कृष्ट काम करतील. त्यांनी सुरू केलेले कोरोना सेंटर निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे. नगर जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही प्रहार कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी आपापल्या परीने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रहारने सुरू केलेल्या कोरोना सेंटरमध्ये १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रहारच्या वतीने या कोरोना सेंटरमध्ये मोफत जेवणाची, राहण्याची तसेच औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय स्टाफही तेथे असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परिसरातील लोकांना हे कोरोना सेंटर वरदान ठरणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष परदेशी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार उमेश पाटील, हभप अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, उपजिल्हाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारी, मेजर सुनील परदेशी, श्रीराम शिंदे, डॉ. काकडे, शिंदे आदीसह प्रहार सैनिक उपस्थित होते.
------------
फोटो मेल
०६ प्रहार कोरोना सेंटर
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने औरंगाबाद रोडवर मोफत कोरोना सेंटरचे उद्घाटन तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.