जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होणार राज्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 09:45 PM2019-12-29T21:45:07+5:302019-12-29T22:19:08+5:30

तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे पंचवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत.

Prajakt Tanpure will be the Minister of State | जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होणार राज्यमंत्री?

जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होणार राज्यमंत्री?

अहमदनगर:  राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार तनपुरे हे उद्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे पंचवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्चविद्याविभूषित असून ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत. ही पदवी त्यांनी पुणे येथून मिळवली. एम ई ही पदव्युत्तर पदवी अमेरिकेमधून त्यांनी घेतली आहे.

प्राजक्त हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आतापर्यंत राहुरी विधानसभेला कोणतेही मंत्रीपद नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे अकोले येथील आमदार किरण लहामटे यांच्यासाठी आग्रही होते परंतु अजित पवार व जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या साठी आग्रह धरला. त्यामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्राजक्त तनपुरे यांचे नाव राज्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचे समजते.
 

Web Title: Prajakt Tanpure will be the Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.