दिव्यांग प्रकाश भोसले शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:50 PM2019-06-22T15:50:36+5:302019-06-22T15:50:56+5:30
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेतील इ५ वी मधील दिव्यांग विद्यार्थो प्रकाश भोसले यांनी २१० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
निंबळक : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेतील इ५ वी मधील दिव्यांग विद्यार्थो प्रकाश भोसले यांनी २१० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
प्रकाश हा जन्मत:च बहुविकलांग आहे. तो व्हीलचेअरचा आधार घेत शाळेत येतो. त्याने दिव्यांगावर मात करत हे निर्भेळ यश प्राप्त केले आहे. त्याला वर्गशिक्षक शरद जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापिका यमुना शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले. योगदिनाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकांनी एक हजार रुपये देऊन सरपंच साधनाताई लामखडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. मुख्याध्यापक पोपट धामणे, अखिल शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे, दत्तात्रय कडूस, सुखदेव पालवे, दिगंबर भारती, दत्तात्रय जाधव, विशाल कुलट , मंदाकिनी बोंबले, कल्पना शिंदे, अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, प्रयागा मोहोळकर, सुजाता किंबहुणे, अर्चना जाचक उपस्थित होते.