फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून प्रमोद कांबळे यांचे कौतुक
By Admin | Published: May 21, 2014 11:47 PM2014-05-21T23:47:40+5:302014-05-22T00:02:11+5:30
अहमदनगर : युरोप दौर्यावरून परतलेल्या प्रमोद कांबळे यांना फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोईस हॉलंडे यांचे चित्र रेखाटण्याची संधी मिळाली. स्वत:चे चित्र पाहून हॉलंडेही हरखून गेले.
अहमदनगर : युरोप दौर्यावरून परतलेल्या प्रमोद कांबळे यांना फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोईस हॉलंडे यांचे चित्र रेखाटण्याची संधी मिळाली. स्वत:चे चित्र पाहून हॉलंडेही हरखून गेले. त्यांनी शुभेच्छा आणि कौतुक करणारे पत्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना पाठविले आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेले शुभेच्छा पत्र म्हणजे मोठा सन्मानच असल्याची भावना शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा सन्मान मिळालेले कांबळे हे नगरचे पहिलेच कलाकार ठरले आहेत. कलाजगत या संस्थेच्यावतीने मुलांसाठी सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकात २५ मे पासून पंधरा दिवसांचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,चहा आणि कॉफी पिण्याचा मगांचा संग्रह करण्यात आला आहे. किमान एक हजार मग संग्रहात असावेत, असा निर्धार केला आहे. देशाच्या विविध भागातील आणि विदेशातील विविध आकाराचे, विविध रंगातील मग संग्रहित करण्यात आले आहेत. लवकरच त्याचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. नवोदित कलाकारांना प्रेरणा, प्रोत्साहन, प्रशिक्षण व महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे मार्गदर्शन मिळावे व जिल्ह्यातूनही चांगले कलावंत निर्माण व्हावेत. शिबिरात कलर अॅप्लीकेशन, मास्क मेकिंग, स्टोन पेटिंग, प्लेट पेंटिंग, न्यूजपेपर फ्रेम मेकिंग, शिल्पकला, चित्रकला व कला क्षेत्राशी निगडित गोष्टी शिकविल्या जाणार आहेत. मुंबई येथील प्रसिद्ध कलावंत नागराज चारी व आदित्य चारी, अंबरनाथ येथील विजय मोहन यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे. व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, निसर्ग चित्रकार रावसाहेब गुरव, रेखाचित्रकार सुधाकर चव्हाण, पुण्याचे कलावंत रामकृष्ण कांबळे, प्रमोद कांबळे, अक्षरलेखन तज्ज्ञ अच्युत पालव, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप होईल. शिबिरासाठी शुभंकर आणि मोना कांबळे परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)