साठ हजार शिक्षकांना प्राणायामाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:03+5:302021-05-10T04:20:03+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शिक्षकांना आर्ट ऑफ लिव्हिंग प्राणायाम, योगासने आणि ध्यानाचे धडे देणार आहे. ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शिक्षकांना आर्ट ऑफ लिव्हिंग प्राणायाम, योगासने आणि ध्यानाचे धडे देणार आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे १२३ योगशिक्षक ऑनलाइन प्रशिक्षण शिबिर घेणार आहेत. या उपक्रमाची सोमवारपासून सुरवात होत असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात एक भीती पसरली आहे. तसेच प्रतिकारशक्ती वाढवणे, ऑक्सिजन पातळी संतुलित ठेवणे यासाठी शेकडो प्रयोग सांगितले जातात. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अनेकांना शक्य होत नाही. शिक्षकांनाच प्रशिक्षण दिले तर तेही समाजातील हजारो नागरिकांपर्यंत योगाचे महत्त्व सांगतील. याच हेतुने हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. घरीच राहून शिक्षकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरात १५ दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आले. प्राणायाम, ध्यान, योगासने शिकवली जाणार असून, शरीर, प्राण आणि जीवन जगण्याची कला, आहार याविषयी ज्ञानसत्रही राहणार आहे. एका बॉचमध्ये ५०० शिक्षक सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे १५ दिवसांत ६० हजार जणांना योगाचे धडे देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
----
योगशिबिर कशासाठी ?
प्रतिकारशक्ती वाढविणे
ऑक्सिजन पातळी वाढविणे
कोरोनाची भीती दूर करणे
चांगेल जीवन जगण्याची प्रेरणा
-------