श्रीगोंदा तहसिल कार्यालयात मिळणार प्रांताधिकारी कार्यालय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:39 IST2021-02-15T15:37:33+5:302021-02-15T15:39:20+5:30
श्रीगोंद्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने सोडविण्यासाठी श्रीगोंद्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यामुळे त्यामुळे नागरिकांना उपविभागीय कार्यालयातील कामासाठी नगरला जाण्याची वेळ येणार नाही.

श्रीगोंदा तहसिल कार्यालयात मिळणार प्रांताधिकारी कार्यालय सुविधा
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने सोडविण्यासाठी श्रीगोंद्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यामुळे त्यामुळे नागरिकांना उपविभागीय कार्यालयातील कामासाठी नगरला जाण्याची वेळ येणार नाही.
उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणारी कामे शस्त्र परवाने नुतनीकरण करणे, जातीचे दाखले, नॉन क्रमीनल, निराधार व्यक्ती दावे, गौण खनिज दंडात्मक कारवाई दावे, जमीन वादविवाद दावे उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणारी सर्व सेवा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात मिळणार आहेत.
शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या प्रश्नांसाठी मला श्रीगोंदा तहसिल कार्यालयात भेटावे. कायद्याच्या चौकटीत अधीन राहुन प्रश्नास न्याय देण्यासाठी सकारात्मक दृष्टीने कर्तव्य बजावेल, असा विश्वास उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी व्यक्त केला.