प्रांताधिकाऱ्यांनी घेतला बेलापूरचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:19 AM2021-04-02T04:19:53+5:302021-04-02T04:19:53+5:30
त्यांनी गावातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, देवीदास ...
त्यांनी गावातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, देवीदास देसाई उपस्थित होते.
प्रांताधिकारी पवार म्हणाले, मास्क वापरणे सर्वांना सक्तीचे करा, दुकानदारांनी मास्क वापरले नाही व ग्राहकांना वापरण्याची सक्ती केली नाही तर ते दुकान सात दिवस सील करावे, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरु ठेवा, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मास्कचा वापर व शारीरिक अंतर ठेवण्यासाठी दवंडी दिल्याचे सांगितले. आरोग्याधिकारी देवीदास चोखर, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, दिलीप दायमा, किशोर कदम, अकबर टिनमेकरवाले आदी उपस्थित होते.
बेलापूर परिसरातील १२ गावांमध्ये ४४ कोरोना रुग्ण आहेत. बेलापूर खुर्द मध्ये संख्या अधिक आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या सुमारे ७१९ आहे. रॅपीड टेस्ट करण्यात आली असता २३ व्यक्ती संक्रमित मिळाले. ८६४ जणांना लस देण्यात आली आहे, असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.
--------