पाथर्डीमध्ये प्रताप ढाकणेंचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:13 PM2018-09-05T15:13:12+5:302018-09-05T15:13:17+5:30
स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचा नाईक चौकात रास्ता-रोको करीत पुतळा जाळला.
पाथर्डी : स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचा नाईक चौकात रास्ता-रोको करीत पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्यानी ढाकणेंच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
प्रताप ढाकणे यांनी काल पत्रकार परीषद घेऊन वंजारी समाज आरक्षण, ऊस तोडणी कामगारांच्या आंदोलनाबाबत आपली भूमीका मांडली होती. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज दुपारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाईक चौकात जमा झाले. प्रताप ढाकणे यांचा निषेध करीत त्यांचा पुतळा जाळत रास्ता रोको आंदोलन केले.
सोमनाथ खेडकर म्हणाले, ढाकणे हे वाचाळ असून लबाड राजकारणी आहेत. भाजपमध्ये त्यांना आणायला आम्ही पुढाकार घेतला होता. परंतु चर्चेच्या वेळी आम्हाला बाहेर थांबा, असे सांगितल्याने ते किती लबाड आहेत, हे कळते. वंजारी समाजाचे खरे कल्याण स्व.गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूध्द अपशब्द आम्ही खपवून घेणार नाहीत. येळीचे सरपंच संजय बडे म्हणाले, वंजारी समाजाला आरक्षण १९९४ ला मिळाले. मुंडे यांच्या विरूध्द बोलल्यामुळे राष्ट्रवादी आपल्याला काहीतरी देईल, या हेतूने त्यांनी हा प्रकार केला आहे. मुंडेंची बदनामी आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी तालुकाघ्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार, भगवान साठे यांची भाषणे झाली.
आंदोलनात माजी जिल्हा परीषद सदस्य सोमनाथ खेडकर , उपसभापती विष्णूपंत अकोलकर भाजपचे तालुकाघ्यक्ष माणिकराव खेडकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा काशीबाई गोल्हार, येळीचे सरपंच संजय बडे, उपनगराघ्यक्ष बजरंग घोडके, युवा नेते मुकूंद गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगरसेवक नामदेव लबडे, नगरसेविका मंगलताई कोकाटे, मनिषा घुले, जमीर आतार, बाळासाहेब गोल्हार, संजय किर्तणे, माजी जिल्हा परीषद सदस्य भगवान साठे आदिंसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.