अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 03:44 PM2019-12-31T15:44:55+5:302019-12-31T15:45:12+5:30
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सदस्य प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या सदस्या संध्या आठरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड झाली. शेळके हे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे पुतणे आहेत.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सदस्य प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या सदस्या संध्या आठरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड झाली. शेळके हे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे पुतणे आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे. निवड झाल्यानंतर घुले यांनी विखे गटाचे सदस्य आणि भाजपच्या सदस्यांशी हस्तांदोलन करीत आभार मानले. घुले यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले. घुले यांच्या पहिल्या अर्जावर कैलास वाकचौरे हे तर दुसºया अर्जावर माधव लामखेडे सूचक आहेत. शेळके यांनीही दोन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या एका अर्जावर अनिता हराळ तर दुसºया अर्जावर रामहरी कातोरे यांनी सूचक म्हणून सही केली होती.