पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:33 AM2020-09-25T11:33:49+5:302020-09-25T11:34:57+5:30

अकोले शहरातील प्रवरा नदीपात्रातील केटीवेअरजवळ पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा पाण्यात बुडुन मृत्यू  झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.

Pravara, a homeguard who went for a swim, drowned in a river basin | पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

अकोले: शहरातील प्रवरा नदीपात्रातील केटीवेअरजवळ पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा पाण्यात बुडुन मृत्यू  झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. संदेश राजेंद्र विटनोर असे या मृत पावलेल्या होमगार्डचे नाव आहे.

       अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी अकोले तालुका पोलीस स्टेशनमध्ये काही होमगार्डची पोलिसांना मदत कामी नियुक्ती केली होती. अकोले पोलिसांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अगस्ती मंदिर या ठिकाणी केलेली होती. २४ सप्टेंबर रोजी मूळ राहुरी येथील राहणारा व सध्या अकोले पोलीस स्टेशनला बंदोबस्त कामी नेमणूक असलेला होमगार्ड संदेश राजेंद्र विटनोर हा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीपात्रातील नगरपंचायतकेटीवेअरजवळ  इतर होमगार्ड मित्रासमवेत पोहण्यासाठी गेले होता. यावेळी पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

    याबाबत इतर होमगार्ड मित्रांनी तत्काळ अकोले पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे यांना कळविले.  पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पो कॉ.संदीप पांडे, पो.कॉ. सचिन शिंदे हे घटनास्थळी गेले होते. 

    दिवसभर शोध घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान त्याचा मृतदेह सापडला. दरम्यान दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. सोमवारी सायंकाळी अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: Pravara, a homeguard who went for a swim, drowned in a river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.