प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:45+5:302021-05-31T04:16:45+5:30

शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटरच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्‍णालयांतील डॉक्‍टर, रुग्‍णवाहिका चालक, सफाई ...

The Pravara Kovid Care Center became a base for the common man | प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले

प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले

शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटरच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्‍णालयांतील डॉक्‍टर, रुग्‍णवाहिका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्‍टाफचा कोविड योद्धा म्‍हणून सन्‍मान करण्‍यात आला. लोणी येथील प्रवरा कोविड केअर सेंटरमधील डॉक्‍टर, नर्सेस, आरोग्‍य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना गौरविण्‍यात आले. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के, सभापती नंदाताई तांबे, चेअरमन नंदू राठी, भाजपचे सरचिटणीस ॲड. ऋषिकेश खर्डे, भाजयुमोचे सतीष बावके याप्रसंगी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने सेवा ही संघटन या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्‍य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योद्ध्यांना सन्‍मानित करण्‍यात आले.

विखे म्‍हणाले, कोविडचे दुसरे संकट सर्वांनाच घाबरवून सोडणारे होते. खासगी रुग्‍णालयात आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्‍यामुळेच प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करावे लागले. अतिशय कमी कालावधीत सर्वांच्‍या सहकार्याने सुरू झालेल्‍या सेंटरमधील ८०० रुग्‍ण आतापर्यंत यशस्‍वी उपचार घेऊन घरी गेले. या सर्व कामाच्‍या पाठीमागे मानवतेचा दृष्‍टिकोन होता आणि संकटाच्‍या काळात समाजाच्‍या पाठीशी उभे राहण्‍याची प्रवरा परिवाराची परंपरा होती.

300521\img-20210530-wa0111.jpg

लोणी येथील प्रवरा कोव्‍हीड केअर सेंटरमधील कर्मचारी यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.

Web Title: The Pravara Kovid Care Center became a base for the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.