प्रवरा नदीचा कालवा नांदूर गावात फुटला; पाच एकर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:10 PM2017-12-07T16:10:34+5:302017-12-07T16:10:45+5:30

अहमदनगर : प्रवरा नदीचा कालवा गुरुवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर गावात फुटला असून, या कालव्याच्या पाण्यामुळे सुमारे पाच एकर ...

Pravav river canal in Nandur village; Five acres of farming under water | प्रवरा नदीचा कालवा नांदूर गावात फुटला; पाच एकर शेती पाण्याखाली

प्रवरा नदीचा कालवा नांदूर गावात फुटला; पाच एकर शेती पाण्याखाली

अहमदनगर : प्रवरा नदीचा कालवा गुरुवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर गावात फुटला असून, या कालव्याच्या पाण्यामुळे सुमारे पाच एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान धरणाकडून कालव्याद्वारे येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही हे पाणी थांबण्यासाठी २० तास लागतील. त्यामुळे पुढील २० तास ही शेती पाण्याखालीच राहणार आहे. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेत. पुढील सुमारे २० तास हे पाणी सुरुच राहिल्यास शेतीचे मोठे नुकसान होणार असून, अनेकांची जमिन या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणार असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

Web Title: Pravav river canal in Nandur village; Five acres of farming under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.