पावसाची दुसर्या दिवशीही हजेरी
By Admin | Published: June 10, 2015 01:13 PM2015-06-10T13:13:31+5:302015-06-10T13:15:28+5:30
शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिराने पावसाने जोरदार हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील एकजण घराचे छत अंगावर पडून जखमी झाला.
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिराने पावसाने जोरदार हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील एकजण घराचे छत अंगावर पडून जखमी झाला.
मंगळवारी पावसाचा जोर कायम होता. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सोमवारी सरासरी २३ मि. मी. पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. परंतु, रात्री उशिराने वादळी वार्यासह शहरात पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह तालुक्यात २९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सरासरी ९. ४७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील काही भागात वृक्षांच्या फांद्या पडून विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. नगर तालुक्यातील अरणगाव मंडळात सोमवारी रात्री ६७ मि. मी. पाऊस झाला. शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे ४७ मि. मी. पाऊस पडला. याच तालुक्यातील भातकुडगाव येथेही ४३ मि. मी. पाऊस झाला. असून, वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)