मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:42+5:302021-07-31T04:21:42+5:30
मुळा धरणाचा मागील वर्षाचा अतिरिक्त साठा दोन हजार दशलक्ष घनफूट उपलब्ध होता. यंदा पाणलोट क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत ४५० मिलीमीटर पावसाची ...
मुळा धरणाचा मागील वर्षाचा अतिरिक्त साठा दोन हजार दशलक्ष घनफूट उपलब्ध होता. यंदा पाणलोट क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत ४५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर दरवर्षी साधारणपणे हजार मिलीमीटर पाऊस होतो. यंदा सरासरी इतका पाऊस पडला आहे. मुळा धरणाकडे १० हजार क्युसेकने आवक सुरू आहे. त्यामुळे यंदा मुळा धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. मुळा धरण गेल्या तीन वर्षांपासून ओव्हर फ्लो होत आहे.
धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत. लाभ क्षेत्राबरोबर पाणलोट क्षेत्रावर ही पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सूर्यदर्शन ही झालेले नाही.
.......................
जायकवाडीचा वाटा मिळणार
गेल्या तीन वर्षांपासून मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे जायकवाडीला यंदाही पाणी सुटण्याची चिन्हे आहेत. जायकवाडीला पाणी सुटल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी बिनधास्त असतात. त्यातून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
................
मुळा धरणात समाधानकारक पाण्याची पातळी आहे. गुरूवारी कोतूळ येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाण्याची आवक समाधानकारक आहे. यंदा पाणीसाठा समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
- अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, शाखा अभियंता