अधिकारी असल्याचे भासवून हॉटेलचालकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:35+5:302021-05-31T04:16:35+5:30
याबाबत सुनील माधव फड यांनी तक्रार दाखल केली आहे. २८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास माधव फड व ...
याबाबत सुनील माधव फड यांनी तक्रार दाखल केली आहे.
२८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास माधव फड व त्यांचा भाऊ अनिल हॉटेलसमोरील अंगणात बसले होतो. त्यावेळी तेथे एका वाहनातून आलेल्या तिघांनी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सांगून २५ हजार रुपयांची मागणी केली. ते घाईघाईने जात असल्यामुळे संशय आला. दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना आश्वी बुद्रूक येथील पेट्रोल पंपाजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीला कट मारून भरधाव वेगाने निघून गेले.
आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नयन पाटील व त्याचे सहकारी करत आहेत. भीमराव वाघमारे व रामेश्वर शिदे (दोघे रा. सिन्नर, जि. नाशिक) या दोन तोतया अधिकाऱ्यांच्या मुसक्या पोलीस निरीक्षक नयन पाटील, हवालदार काळे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, होमगार्ड गुळवे यांनी आवळून ताब्यात घेतले.