सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून सोन्याची चैन पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 04:41 PM2020-09-04T16:41:39+5:302020-09-04T16:42:01+5:30
मी सीआयडीत अधिकारी आहे. तुमच्या गावात गोंधळ झालाय. तुमच्याजवळील वस्तू काढून रुमालात बांधा, असे सांगून श्रीगोंदा शहरात भीमराव कवडे या व्यक्तीजवळील एक सोन्याची चैन दोन भामट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता दौंड-जामखेड रस्त्यावर घडली.
श्रीगोंदा : मी सीआयडीत अधिकारी आहे. तुमच्या गावात गोंधळ झालाय. तुमच्याजवळील वस्तू काढून रुमालात बांधा, असे सांगून श्रीगोंदा शहरात भीमराव कवडे या व्यक्तीजवळील एक सोन्याची चैन दोन भामट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता दौंड-जामखेड रस्त्यावर घडली.
कवडे यांचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी जात होते. यावेळी जुन्या स्टेट बँकेजवळ एका दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने कवडे यांना अडविले. शहरात गोंधळ झालाय. मी सीआयडीत अधिकारी आहे, असे सांगून त्यांना बनावट ओळखपत्र दाखवून त्यांना त्यांच्याकडील वस्तू रुमालात बांधायला सांगितल्या. त्याचवेळी या व्यक्तीने रस्त्याने जाणाºया एका व्यक्तीला अडवून त्याला दमदाटी केली. परतु ती व्यक्ती त्याचीच साथीदार होती. रुमालात घड्याळ व इतर वस्तू बांधत असतानाच या चोरट्याने कवडे यांच्या गळ्यातील चैन रुमालात ठेवली. ही चेैन घेऊन दोन्ही भामट्यांनी पलायन केले.