कोपरगावात कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:41+5:302021-02-20T04:57:41+5:30
कोपरगाव : तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आली असल्याची असल्याची माहिती तहसीलदार योगेश ...
कोपरगाव : तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आली असल्याची असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१९ ) जिल्ह्यातील तालुकानिहाय विविध खात्यांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले.
चंद्रे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक सरकारी व निमसरकारी कार्यालयात मास्कची सक्तीने करण्यात येणार आहे. तसेच ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याची सुचना केली आहे. तसेच कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थकेअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी करण्यात यावी. कोविड बाधित रुग्णांचे विलिनीकरण तसेच त्यांचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे पालन प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग कायद्याच्या तरतूदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.