आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:07+5:302021-02-05T06:27:07+5:30
घारगाव : आंबी खालसा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी एकोप्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केली. अशा बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी ...
घारगाव : आंबी खालसा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी एकोप्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केली. अशा
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही. मी निधी जाहीर केल्यानंतर काहीजणांनी हा निधी कोठून देणार, अशी चर्चा केली. मात्र आधीच्या आमदाराला निधी कोठून येतो, हे कळालेच नाही, अशी टीका डॉ. किरण लहामटे यांनी माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव न घेता केली.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ग्रामपंचायत तब्बल २५ वर्षांनंतर बिनविरोध झाली. नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब ढोले, रशीद सय्यद, विलास मधे, दिलीप हांडे, दीपक गावडे, मनीषा गाडेकर, शुभांगी कहाणे, अनिता तांगडकर, अंजली गाडेकर, अंजना जाधव, सुवर्णा गडगे या अकरा नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सुरेश कान्होरे, सर्जेराव ढमढेरे, तुळशिनाथ भोर, दत्तात्रय कान्होरे, अशोक गाडेकर, पांडुरंग शेळके, नीलेश गायकर, गणेश लेंडे, सुरेश गाडेकर, संतोष घाटकर आदी उपस्थित होते. लहामटे म्हणाले, आंबीखालसा गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून इतिहास रचला आहे. जिरवाजीरवीचे राजकारण करायला बरेच आहेत. आपल्या सर्वांना मिळून विकासाचे राजकारण करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी संतोष शेळके, सर्जेराव ढमढेरे, तुळशीनाथ भोर, किशोर डोके, शांताराम गाडेकर, शांताराम वाकळे, नाना गाडेकर, शांताराम तांगडकर, चैतन्य कहाणे, दाऊत शेख, नीलेश गायकर, गणेश लेंडे, गोरक्ष ढोकरे, डाॅ. प्रीतम ढमढेरे आदींची भाषणे झाली.