प्राचार्य बी. एच. झावरे यांची विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:59 PM2019-06-14T14:59:55+5:302019-06-14T14:59:59+5:30
येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांची पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर (अॅकॅडमिक कौन्सिल) निवड झाली.
अहमदनगर : येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांची पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर (अॅकॅडमिक कौन्सिल) निवड झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल यांच्याशी विचारविनिमय करून डॉ. झावरे यांची विद्या परिषदेवर सदस्य म्हणून निवड केली. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा विद्या परिषदेच्या कामकाजात लाभ होईल, असे विद्यापीठाने दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. ३१ आॅगस्ट २०२२पर्यंत त्यांच्या सदस्यत्वाची मुदत आहे. या नियुक्तीबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार विवेक भापकर, विश्वस्त रामनाथ वाघ, डॉ. मोहनराव हापसे, सीताराम खिलारी, चंद्रकांत मोरे आदींनी डॉ. झावरे यांचे अभिनंदन केले.