अहमदनगरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:37 PM2018-06-01T17:37:45+5:302018-06-01T17:40:31+5:30

तोफखाना पोलीसांनी गुरूवारी रात्री कोठला येथील झोपडपट्टीत छापा टाकून १० लाख ५६ हजार रूपयांची सुगंधी तंबाखू व विमल पानमसाला जप्त केला. यावेळी तिघांना अटक करण्यात आली.

Print on Gutkha godown in Ahmednagar | अहमदनगरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा

अहमदनगरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा

ठळक मुद्दे१० लाख ५६ हजारांचा पान मसाला जप्त: तोफखाना पोलीसांची कारवाई

अहमदनगर: तोफखाना पोलीसांनी गुरूवारी रात्री कोठला येथील झोपडपट्टीत छापा टाकून १० लाख ५६ हजार रूपयांची सुगंधी तंबाखू व विमल पानमसाला जप्त केला. यावेळी तिघांना अटक करण्यात आली.
कोठला येथील हॉटेल कुरेशीच्या बाजुला एका घरात शासनाने बंदी घातलेला पानमसाला साठवून ठेवला असल्याची माहिती तोफखाना ठाण्याचे निरिक्षक सुरेश सपकाळे यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलीस उपनिरिक्षक संजयकुमार सोने यांच्यासह पथकाने छापा टाकला तेव्हा समीर बाबुलाल कुरेशी याच्या घरात पानमसाल्याचे ३६ पोते आढळून आली. यावेळी पोलीसांनी कुरेशी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले़ यावेळी अन्न, औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले होते. याबाबत पुढील कारवाई अन्न, औषध प्रशान विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. सोने यांच्यासह कॉस्टेबल दौंड, वाघचौरे, गायकवाड, रोहोकले, कोतकर, याकुब सय्यद, जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नगरमध्ये गुटखा तस्करी तेजीत
शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीला बंदी घातलेली आहे. राज्यात गुटखा व तंबाखूचे उत्पादन होत मात्र मात्र शेजारील राज्यातून गुटखा व तंबाखू महाराष्ट्रात आणली जाते. नगर शहरासह जिल्ह्यातही हा गुटखा आणि सुगंधी तंबाखू राजरोसपणे विकली जाते. अन्न, औषध प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

 

Web Title: Print on Gutkha godown in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.