कोपरगावातील जुगार अड्ड्यावर छापा : २८ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 04:36 PM2018-04-27T16:36:46+5:302018-04-27T16:44:43+5:30

नगर-मनमाड रोडवरील येसगाव शिवारातील साईतेज हॉटेलवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात २८ जणांना रंगेहाथ पकडले आहे. यात पोलिसांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Print this on Kapuragawa Jagar Bazar: 28 people caught | कोपरगावातील जुगार अड्ड्यावर छापा : २८ जणांना पकडले

कोपरगावातील जुगार अड्ड्यावर छापा : २८ जणांना पकडले

ठळक मुद्दे२५ लाखांचा ऐवज जप्त हॉटेल मालकही अटकेत

कोपरगाव : नगर-मनमाड रोडवरील येसगाव शिवारातील साईतेज हॉटेलवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात २८ जणांना रंगेहाथ पकडले आहे. यात पोलिसांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अहमदनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात जुगार व पत्ते खेळताना जवळपास २८ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख १ लाख ८३ हजार, २९ मोबाइल, सहा चार चाकी व दहा दुचाकी असे मिळून अंदाजे २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
या अटक केलेल्यामध्ये हॉटेल चालक -मालक अस्लम सोनेवाला, गुलाब शहा, विवेक घोडके (मनमाड), रोहित खाण, वसंत वढे, दयानंद जावळे, निलेश लोंढे, सुनील खडांगळे, मनोज दानी, शिवा हिरे, सचिन बिवालवामन, निस्सार शेख (येवला), वाल्मिक कोळपे-कोळपेवाडी (कोपरगाव), बबलू शेख, संजय निकम (मालेगाव), श्रीराम लाटे (शिवूर, ता.वैजापूर), तुषार मेहारखाब (सुरेगाव), शकील अन्सारी (नाशिक), सतिश सोनवणे, एत्तेफाशार्या शहा (वैजापूर), कैलास जेजुरकर, निलेश कापसे (अंदरसूल), समध शेख (एरंडगाव, ता. येवला), नवनाथ मोरे (गोधेगाव ता.येवला), मनोज पानगव्हाणे (निफाड), गंगाधर चव्हाण (निफाड), बालाजी मेढे (नांदेड) यांच्यासह २८ जणांचा समावेश आहे. एका खबऱ्याकडून कालवानिया व पाटील यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुधीर पाटील, बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, विशाल गवांदे, दिनेश मोरे, अण्णा पवार, मेघराज कोल्हे, बबन बेरड, फौजदार कल्याण शेळके, बी.आर.परकाळे, गणेश धुमाळ, बाबासाहेब काकडे, किरण अरकल, अण्णा डाके, धनंजय करंडे, अर्जुन बढे आदींचा या पथकात समावेश होता.

 

Web Title: Print this on Kapuragawa Jagar Bazar: 28 people caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.