आनंददायी दर्शनाबरोबरच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:11+5:302021-09-26T04:23:11+5:30

बाणायत म्हणाल्या, राज्य शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला, ही भाविकांसाठी व शिर्डीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हळूहळू सर्व पूर्वपदावर येईल. ...

Priority is given to the safety of devotees along with pleasant darshan | आनंददायी दर्शनाबरोबरच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

आनंददायी दर्शनाबरोबरच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

बाणायत म्हणाल्या, राज्य शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला, ही भाविकांसाठी व शिर्डीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हळूहळू सर्व पूर्वपदावर येईल. शासनाचे व कोविडचे नियम पाळून भाविकांना दर्शन देताना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल. प्रत्येक भाविकाचे स्क्रिनिंग करण्यात येईल. मास्क, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक असेल. कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांनाच दर्शनाला मंदिरात जाता येईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मूर्ती, पादुकांना हस्तस्पर्श करता येणार नाही. पारायण कक्ष, सत्यनारायण व अभिषेक पूजा तूर्तास बंदच ठेवण्यात येतील. प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग नियंत्रित व मर्यादित असतील. कोरोनाचा संसर्ग होईल अशा गोष्टी कटाक्षाने टाळण्यात येतील. रांगेतून चालणाऱ्या भाविकांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे लागणार असल्याने रोज जास्तीत जास्त किती भाविकांना दर्शन देता येईल. याबाबत आम्ही अभ्यास करत आहोत. मंदिर उघडण्यासाठी व भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.

..........

वीजतोडणीमुळे व्यावसायिक चिंतेत

गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या शिर्डीतही नवचैतन्य आले आहे. व्यावसायिक आनंदी आहेत. दुकाने, लॉजेस, रेस्टॉरंट आदींनी स्वच्छतेसारख्या तयारींनीही वेग घेतला आहे. अनेकांची वीज बिल थकल्याने वीज जोडणी तोडण्यात आलेली आहे. बिले भरल्याशिवाय कनेक्शन जोडले जाणार नाही, व्यवसाय सुरू करण्यासाठीही पैसे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर मात्र व्यावसायिक चिंतेत आहेत.

.................

०० प्रत्येक भाविकाचे होणार स्क्रिनिंग

०० मास्क, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक

०० कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांनाच दर्शनाला प्रवेश

०० भाविकांना मूर्ती, पादुकांना हस्तस्पर्श करता येणार नाही.

०० पारायण कक्ष, सत्यनारायण व अभिषेक पूजा तूर्तास बंदच.

०० प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग मर्यादित.

Web Title: Priority is given to the safety of devotees along with pleasant darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.