निंबळकमध्ये प्रियंका लामखडे सरपंचपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:14+5:302021-02-11T04:22:14+5:30
निंबळक : निंबळक (ता. नगर) येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी प्रियंका लामखडे यांची बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर ...
निंबळक : निंबळक (ता. नगर) येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी प्रियंका लामखडे यांची बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर यांची निवड झाली.
निंबळक गावात पुन्हा सरपंचपदाची धुरा महिलेच्या खांद्यावर आली असून, लामखडे परिवारातील चौथी पिढी सरपंचपदाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी गुप्त पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. सरपंचपदासाठी प्रियंका लामखडे व राजेंद्र कोतकर यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रियंका लामखडे यांना अकरा, तर राजेंद्र कोतकर यांना सहा मते पडली. लामखडे यांचा पाच मतांनी विजय झाला. उपसरपंचपदासाठी बाळासाहेब कोतकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नालेगाव सर्कल राजू आंधळे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कालिंदी लामखडे, अजय लामखडे, केतन लामखडे, शरद ठाणगे, रमाकांत गाडे, प्रभाकर जाधव, श्रीकांत शिंदे, अनिता गायकवाड, मालन रोकडे, विलासराव लामखडे, पद्मा घोलप, बाबासाहेब पगारे, सोमनाथ खांदवे, ज्योती गायकवाड, कोमल शिंदे आदी उपास्थित होते.