एक डोळा पद्धतीतून एकरी ७१ टनाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:40 PM2018-05-25T12:40:02+5:302018-05-25T12:40:10+5:30

ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस लागवड किफायतशीर ठरली आहे.

The production of 71 tons of one eye method | एक डोळा पद्धतीतून एकरी ७१ टनाचे उत्पादन

एक डोळा पद्धतीतून एकरी ७१ टनाचे उत्पादन

श्रीगोंदा : ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस लागवड किफायतशीर ठरली आहे.
शिरूर-बेलवंडी रोडवर ढवळगाव येथील शेतकरी माळरानावर कांदा, भाजीपाला, गहू, ज्वारी अशी प्रामुख्याने पिके घेतात. ज्या शेतकºयाकडे थोडे फार पाणी आहे, असेच काही ठराविक शेतकरी उसाचे पीक घेतात. त्यामुळे शेतकºयांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. परंतु अलिकडील काळात येथील शेतकरी शेतीत बदल करून नवनवीन प्रयोग करू लागले. गावातील धोंडिबा संतू ढवळे हे पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. त्यांचा मुलगा सोन्याबापू ढवळे यांनी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन एक डोळा पध्दतीने उसाची पध्दत यशस्वी केली आहे.
कृषीतज्ज्ञ प्रदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील एक एकरात उसाचा डोळा पद्धतीने लागवड केली. त्यावेळी त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या होत्या. डोळा काढणी यंत्र, लागवड तंत्रज्ञानाविषयी फारसे माहिती नव्हते. त्यावेळी आयटीसीचे कृषी विस्तार अधिकारी संजय शिंदे यांचे सहकार्य मिळाले. उसाबरोबर आंतरपिकांचा त्यांनी विचार केला. उसामध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले होते. कांद्याचे चार टनाचे उत्पादन मिळाले असून त्यांची साठवणूक करून नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये दोन हजार रुपये क्विंटलने विक्री केली. त्यातून सुमारे ८० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
अनुभवाचे बोल
पारंपरिक पद्धतीने लागवड करताना दोन ते तीन टन ऊस एकरी लागतो. परंतु डोळा पद्धतीने लागवड केल्यामुळे अवघे ५५ ते ६० किलो डोळ्यांचे बियाणे पुरेसे होते. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना उसाचे एकरी ४० टन उत्पन्न मिळत होते. आता सत्तर टनापर्यत उत्पन्न मिळाले. त्यासाठी कृषीतज्ज्ञ प्रदीप निकम यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यातच आयटीसी व अफार्म यांच्यामुळे त्यांना एक नवीन दिशा मिळाली, असे शेतकरी सोन्याबापू ढवळे यांनी सांगितले.
- सोन्याबापू ढवळे, शेतकरी

Web Title: The production of 71 tons of one eye method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.