महात्मा फुले कृषी विद्यापीठाची उत्पादने मिळणार एकाच दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:17 PM2019-09-04T13:17:47+5:302019-09-04T13:18:15+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली आहेत.
राहुरी : विद्यापीठाच्या बियाण्यांना आणि उत्पादनांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विद्यापीठाचे उत्पादने खरेदी करण्यासाठी शेतकºयांना संबंधित विभागात जावे लागत असे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ खर्च व्हायचा. हा वेळ वाचविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. प्रकाश तुरबतमठ, डॉ. दिलीप पवार, डॉ. आनंद सोळुंके उपस्थित होते.
विविध पिकांच्या वाणांचे बियाणे, कलमे रोपे, जैविक खते, जैविक कीडनाशके, प्रक्रिया पदार्थ आणि बेकरी उत्पादने, विद्यापीठ प्रकाशने, बांबू हस्तकला
उत्पादने, कृषी यंत्रे व अवजारे आदी एकाच दालनात शेतकºयांना मिळणार आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे विक्री केंद्र हायवेलगत विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ सुरु केले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि जळगाव या दहा जिल्ह्यातील २७ संशोधन केंद्रांवर विद्यापीठ उत्पादने विक्री केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण सर्व उत्पादने वरील दहा जिल्ह्यातील गावपातळीपर्यंत पोहोच करण्यासाठी विपणन साखळी निर्माण करण्यात आलेली आहे. विद्यापीठस्तरावर विपणन अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलेले असून या पदावर डॉ.पी.एस. बेल्हेकर यांची नियुक्ती केली आहे.
विपणन अधिकारी यांना मदतनीस म्हणून दोन विक्री प्रतिनिधींची नेमणूक करण्यात
येणार आहे. हे विक्री प्रतिनिधी दोन जिल्ह्यात विपणन व्यवस्थापन करतील.
शेतकरी गटांना सवलत
च्शेतकºयांनी एकत्रित गट करुन मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाची उत्पादने खरेदी केल्यास तसेच खासगी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठ उत्पादने खरेदी केल्यास खरेदी रकमेवर सवलत देण्यात येणार आहे.