आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:26 PM2018-03-26T16:26:01+5:302018-03-26T16:27:20+5:30

कोपरगाव : तत्कालिन माजी आमदार अशोक काळे यांनी तालुक्यातील कोळगाव थडी व उक्कडगाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सरकारकडे सादर ...

Prohibition by showing black flags to the MLA kolhe | आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध

आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध

कोपरगाव : तत्कालिन माजी आमदार अशोक काळे यांनी तालुक्यातील कोळगाव थडी व उक्कडगाव पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सरकारकडे सादर करून पाठपुरावा केला. पण या योजनेचे भूमिपूजन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आमदार कोल्हे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
कोळगाव थडी व उक्कडगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून काळे यांनी मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत प्रस्ताव दाखल केले होते. कोळगावच्या योजनेस कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिले. त्यानंतर दोन्ही प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली. योजनेचे भूमिपूजन साध्या पध्दतीने करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. परंतु कोल्हे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता परस्पर भूमिपूजन केल्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत कोळगाव थडीचे उपसरपंच अप्पासाहेब जाधव, ग्रामपंचायतसदस्य, राजेंद्र गवळी, विठ्ठल जगताप, भास्कर मेहेरखांब, भिकन निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, कैलास लुटे, विलास निंबाळकर, नंदकिशोर निंबाळकर, भाऊसाहेब लुटे, दिनकर वाकचौरे, अ‍ॅड. शफिक शेख, गणेश निंबाळकर, सचिन काळे, अप्पासाहेब काळे, वाळिबा निंबाळकर, सोपान शेवाळे यांनी कोल्हे यांना काळे झेंडे दाखवित निषेध नोंदविला.

माजी आमदार अशोक काळे यांच्यामुळे कोळगाव थडीच्या महिलांचा डोक्यावरील हंडा उतरून पाण्याची वणवण कायमची थांबणार आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी योजनेचे साध्या पध्दतीने भूमिपूजन करण्यास संगितले होते. परंतु आयत्या पिठावर रेघा मारणा-या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हाला विश्वासात न घेता केवळ श्रेय लाटण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ‘लोकांची कढी, धाऊ धाऊ वाढी’, असा प्रकार आहे.
-शामल लुटे, सरपंच.

Web Title: Prohibition by showing black flags to the MLA kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.