पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर
By Admin | Published: September 6, 2014 11:48 PM2014-09-06T23:48:13+5:302023-06-27T11:22:28+5:30
राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ अधिकारी धरणाची पाहणी करणार होते.
राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ अधिकारी धरणाची पाहणी करणार होते. परंतु ते न आल्याने स्थानिक अधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला़ दुसरीकडे पाणी सोडण्याचा निर्णयही लांबणीवर पडला असल्याचे स्पष्ट झाले़
मुळा धरणातून पाणी सोडण्याबरोबरच धरण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता लोखंडे,अधीक्षक अभियंता पोकळे, कार्यकारी अभियंता आनंद वडार हे मुळा धरणावर येणार होते. मात्र, अधिकाऱ्यांनी निळवंडे व भंडारदरा या धरणाचे जलपूजन करून मुळा धरण भेटीला दांडी मारली़
मुळा धरणात १५ सप्टेंबरपर्यंत २४ हजार २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडले जाते़ शनिवारी रात्री ९ वाजता मुळा धरणात २३ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली़ सोमवारी धरणात २४ हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद होण्याची शक्यता आहे़ गणेश विसर्जन झाल्यानंतर पाणी सोडण्याची शक्यता होती़ सध्या धरणाकडे ४५५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर वाढून आवक वाढली तरच नदीपात्रात पाणी सोडण्याचे नव्याने पाटबंधारे खाते विचार करीत आहे़
(तालुका प्रतिनिधी)