प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 04:18 PM2019-04-21T16:18:55+5:302019-04-21T16:20:54+5:30

आचारसंहितेनुसार नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत़

Promotional guns will stop in a short time | प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार

प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार

अहमदनगर : आचारसंहितेनुसार नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत़ मतदानापूर्वी ४८ तास आधी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना जाहीर प्रचार, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचार करता येणार नाही तसेच चलचित्र, बल्क एसएमएस व अन्य तत्सम साधनांच्या सहाय्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.
राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही,
याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
नगर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत़ निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी प्रशासनाने विविध पथकांची स्थापना केलेली आहे़ २१ एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. मात्र, उमेदवार वैयक्तिकरित्या प्रचार करु शकतील. परंतु पाच किंवा पाचपेक्षा
जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव असेल. जनतेला आकर्षित करतील अशा संगीतसभा, नाटक
किंवा अन्य मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करुन प्रचार करता येणार नाही.
प्रचार कालावधी समाप्त झाल्यानंतर मतदारसंघात प्रचारासाठी मतदारसंघाच्या बाहेरुन आलेले आहेत आणि जे मतदारसंघाचे मतदार
नाहीत अशा राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचार
मोहिमेतील कार्यकर्ते यांना मतदारसंघात उपस्थित राहता येणार नाही.

Web Title: Promotional guns will stop in a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.