वंचित शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:19 AM2021-04-10T04:19:56+5:302021-04-10T04:19:56+5:30

कोपरगाव : तालुक्यातील तांत्रिक अडचणीमुळे अन्नधान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरित करावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी ...

Promptly distribute foodgrains to deprived ration card holders | वंचित शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरित करा

वंचित शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरित करा

कोपरगाव : तालुक्यातील तांत्रिक अडचणीमुळे अन्नधान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरित करावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, मार्च २०२१ मध्ये तालुक्यातील रेशन दुकानामध्ये आलेले धान्य वाटपास विलंब झाला, मार्च महिन्यात गहू, तांदूळाबरोबर मका वाटप करण्यात आले, परंतु ई-पाॅस मशीनवर मका धान्य वितरण करण्यास अडचणी आल्याने संपूर्ण महिनाभर नागरिकांना धान्याचे वाटप झाले नाही. तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले हे वितरण ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये वाटण्यास सुरूवात केली. परंतु, केवळ ५ दिवस सुरू राहिलेल्या या वाटप मोहिमेत सर्वच नागरिक धान्य घेऊ शकले नाही.

सध्या देशासह राज्यभरात कोरोना महामारीचे संकट पुन्हा वाढले आहे. तालुक्यातील रूग्णसंख्या वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी दृष्टीने शासनाने नुकतेच निर्बंध लागू केलेले आहे. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असलेल्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे. हाताला काम नसल्यामुळे दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनेक कुटुंबांना भेडसावत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबाची कुचंबणा होत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण झालेले नाही, त्या नागरिकांना तातडीने धान्य वितरण करण्यात यावे.

Web Title: Promptly distribute foodgrains to deprived ration card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.