शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:24 PM2024-08-10T13:24:44+5:302024-08-10T13:25:36+5:30

कराची रक्कम मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये जप्तीचे  वॉरंट विमानतळ प्रशासनास ग्रामपंचायतीने दिले.

Property seizure warrant for Shirdi airport | शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट

शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट

कोपरगाव (जि. अहमदनगर) : शिर्डीविमानतळाने २०१६-१७ पासून आतापर्यंतचा ८ कोटी ३० लाखांचा कर थकविल्याने काकडी-मल्हारवाडी (ता. कोपरगाव) ग्रामपंचायतीने विमानतळाची जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी वॉरंट बजावले आहे. ही नोटीस महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनीच्या व्यवस्थापकांना दिली आहे. 

 कराची रक्कम मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये जप्तीचे  वॉरंट विमानतळ प्रशासनास ग्रामपंचायतीने दिले. कंपनीच्या व्यवस्थापकांना नोटिसीत म्हटले आहे की, कर भरण्याबाबत अनेक वेळा पत्र दिले, फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, २४ मार्च २०२४ रोजी हुकूम नोटीस, १२९ प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव देऊनही विमानतळाने करभरणा केलेला नाही.  

Web Title: Property seizure warrant for Shirdi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.