सभापती निवडणूकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:36+5:302021-02-17T04:26:36+5:30
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूकीचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना मंगळवारी पाठविण्यात आला. त्यामुळे सभापती निवडणूकीचा मार्ग ...
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूकीचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना मंगळवारी पाठविण्यात आला. त्यामुळे सभापती निवडणूकीचा मार्ग मोकळाला झाला आहे. सभापती पदासाठी रष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाची चर्चा आहे.
महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. भाजपाचे मनोज कोतकर हे सध्या सभापती आहेत. त्यांचे सभापती पद आठ सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्याने धोक्यात आले आहे. नवीन आठ सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर सभापती पदाच्या निवडणूकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला जातो. विभागीय आयुक्तांकडून सभापती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मान्यतेने प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूकीची वेळ व तारीख जाहीर केली जाईल.
स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले हे इच्छुक आहेत. त्यांनी सदस्यांच्या गाठीभेटी घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. इतर सेना, काँग्रेस आणि भाजपकडून इच्छुक नसल्याचे बोलले जाते. स्थायी समितीत सेना व राष्ट्रवादीचे संख्याबह समान आहे. मागील सभापती निवडणूकीच्यावेळी सेनेने योगिराज गाडे यांचा अर्ज दाखल केला होता. एनवेळी गाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले. सभापती पदावर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने दावा केला असून, सेनेकडून मात्र अद्याप कुणीही या पदावर दावा केलेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
....
असे आहे, स्थायी समितीती संख्याबळ
राष्ट्रवादी- ५, शिवसेना-५, भाजप-४, बसपा-१, काँग्रेस-१