वृक्ष लागवडीतूनच पर्यावरणाचे रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:07+5:302021-06-25T04:16:07+5:30
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील साईबाबा काॅर्नर ते रेल्वे स्थानक या मंजूर रस्त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. या ...
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील साईबाबा काॅर्नर ते रेल्वे स्थानक या मंजूर रस्त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. या रस्त्याच्या मध्यभागी व दोन्ही कडेला वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संजीवनी फाऊंडेशनने घेतली आहे. संजीवनी फाऊंडेशनने बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावरील दुसऱ्या टप्प्याची वृक्ष लागवड केली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी व संजीवनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे विश्वस्त सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, वैभव आढाव, रवी रोहमारे, मयूर कांडेकर, बाळासाहेब आढाव, सरपंच भीमा संवत्सरकर, राजू चांडे आदी उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : २४ बिपीन कोल्हे
कोपरगाव शहरातील रस्त्यावर वृक्ष लागवड करताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे.
--------