राष्ट्रीय किसान दिनी आंदोलकांना क्रांतीच्या गावातील बळीराजाच्या पुतळ्याचे विस्मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:59 PM2022-12-23T15:59:01+5:302022-12-23T16:00:33+5:30
पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत जवळ जगभरातील शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून नांगरधारी शेतकरी अशी बळीराजाच्या पुतळा बसविण्यात आला.
मधु ओझा
पुणतांबा (जि. अहमदनगर): किसान क्रांतीचे गाव म्हणून ओळख असलेल्या पुणतांबा गावात बळी राजाचे प्रतीक म्हणून नांगर धारी शेतकरी असलेला पुतळ्याचे राष्ट्रीय किसान दिवसाच्या दिवशी आंदोलक किसान क्रांतीचे नेते, कार्यकर्ते यांना विस्मरण झाल्याचं दिसून आले.
शेतकरी संपाची हाक देऊन क्रांतिकारी गाव म्हणून संपूर्ण देशाला ओळख झालेल्या पुणतांबा गावात शेतकऱ्याचे आंदोलन झाले याची आठवण कायम स्मृती पटलावर व येणाऱ्या पाहुण्यांना व्हावी या साठी किसान क्रांतीच्यावतीने पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत जवळ जगभरातील शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून नांगरधारी शेतकरी अशी बळीराजाच्या पुतळा बसविण्यात आला. त्यानंतर देशात कुठेही शेतकऱ्याचे आंदोलन झाले की पुणतांबा नेत्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या पुतळ्याजवळ आपल्या वार्तांकन करत. त्यामुळे आपण दूरदर्शनवर दिसणार म्हणून सर्वात आधी या पुतळ्याला पाण्याने अंघोळ, हारतुरे घालूनच कार्यक्रमाची सुरवात केली जात असे. पण आज राष्ट्रीय किसान दिवस असूनही या पुतळ्याचे विस्मरण किसान क्रांतीच्या नेत्यांना झाल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांमधून पुतळ्याची आठवण फक्त आंदोलन पुरतीच का असा प्रश्न विचारला जात आहे. तर पुतळ्याची ही अवस्था तर सामान्य शेतकरी बाबत यांचा जिव्हाळा किती अशीही उलटसुलट चर्चा सुरू आहे