सिस्टरांना रेल्वेतून खाली उतरविण्याच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:14+5:302021-03-28T04:19:14+5:30
१९ मार्चला हरिद्वारहून पुरी (ओडिसा) जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेसमधून दोन नन्स व दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना झांशी रेल्वे स्थानकात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी ...
१९ मार्चला हरिद्वारहून पुरी (ओडिसा) जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेसमधून दोन नन्स व दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना झांशी रेल्वे स्थानकात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरविले. हजरत निजामुद्दीन ते राऊरकडे जात असलेल्या या ट्रेनमध्ये चार ख्रिस्ती महिला प्रवास करत होत्या. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केली की, दोन विद्यार्थिनींना धर्मांतर करण्यासाठी घेऊन जात आहेत. त्यांनी सिस्टरांना कोणाशी तरी काही तरी बोलताना ऐकले; परंतु त्या बोलण्याचा त्यांनी वेगळाच अर्थ घेऊन आरपीएफकडे केलेल्या तक्रारीनंतर आरपीएफने केलेल्या चौकशीअंती ही बाब खोटी ठरली. अशा प्रकारे देशात ख्रिश्चन समाजाविषयी गैरसमजातून होत असलेले प्रकार भयानक असून, ख्रिस्ती धर्मामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारामुळे देशातील तमाम ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. येणाऱ्या काळात हे प्रकार थांबले नाही तर ख्रिस्ती समाजालाही येणाऱ्या काळात दिशा निश्चित करावी लागेल.
एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर, उपाध्यक्ष ॲड. सिरिल दारा, प्रा. बाबा खरात, अविनाश काळे, सुवर्णालता कदम, सॉलोमन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, अन्तोंन भोसले आदींसह जिल्ह्यातील सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने केली.