साईगार्डनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार-सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:18 PM2019-10-16T12:18:52+5:302019-10-16T12:19:11+5:30

साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले.

Provide employment opportunities for young people through Cygarden | साईगार्डनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार-सुजय विखे

साईगार्डनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार-सुजय विखे

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले.
विखे यांनी सोमवारी शहराच्या पूर्व भागातील वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनीही नागरिकांशी संवाद साधला.डॉ. विखे म्हणाले, सत्तेचा अर्थ आमच्यासाठी समाजकल्याण असा आहे़. विकासात्मक कामे उभी करताना कमी-अधिक शिकलेल्या तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे संस्थानच्या माध्यमातून मनोरंजनासाठी उभारलेल्या प्रकल्पात नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम व प्रत्येकाला घर यासाठी पुढील पाच वर्षे आपण काम करणार आहे.
शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहयोगामुळे राहाता तालुका विकासात अग्रेसर आहे. डॉ़ सुजय विखे यांनी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले. शहरात गेल्या अडीच वर्षात जवळपास दोनशे कोटींची कामे मार्गी लागली. स्वच्छतेत शहराने देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली. पाटपाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. निळवंडेबाबत आमच्या कुटुंबावर आरोप करणाºयांचे पितळ आता उघडे पडले आहे़ खरे काम करणारे कोण हे लोकांना आता समजले आहे़ 
 नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, माजी नगराध्यक्षा योगिताताई शेळके, अभय शेळके, नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, दिगंबर कोते, रतीलाल लोढा,  कविता निकम उपस्थित होते. 

Web Title: Provide employment opportunities for young people through Cygarden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.