शेततळ्यातील कागदासाठी अल्पदरात कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:00+5:302021-06-30T04:15:00+5:30

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी शेळके यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पारनेर ...

Provide low cost loans for farm paper | शेततळ्यातील कागदासाठी अल्पदरात कर्ज द्या

शेततळ्यातील कागदासाठी अल्पदरात कर्ज द्या

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी शेळके यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ असतो. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाळ्यात शेततळ्याची दुरुस्ती करताना आर्थिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेततळ्यातील कागदासाठी अल्पव्याज दरात कर्ज मिळावे, रांजणगाव मशीद येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे आधुनिकीकरण करावे, ग्रामीण भागात बँकेने एटीएम सुविधा सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी सरपंच काका देशमुख, राहुल शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ओळी

शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अल्पव्याजदराने कर्ज मिळावे, ग्रामीण भागात एटीएम सुविधा द्याव्यात या मागण्यांचे निवेदन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांना देताना राहुल शिंदे व शेतकरी प्रतिनिधी.

Web Title: Provide low cost loans for farm paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.