कोपरगावसाठी रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:56+5:302021-04-29T04:15:56+5:30
कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडिसिवर ...
कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडिसिवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही, यापाठोपाठ आत्ता रॅपिड अँटिजन किटचा तुटवडा निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण भागातील तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना विनातपासणी माघारी जावे लागत आहे, त्यामुळे तत्काळ या किट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
कोल्हे म्हणाल्या, काही नागरिकांना लक्षणे असतानाही आपण सुरक्षीत असल्याचे गृहीत धरून नागरिक बिनधास्त वावरत आहे. अशीच परिस्थिती राहते की काय, असेही आत्ता वाटायला लागले आहे. सरकारने बंधनकारक केलेल्या चाचण्यांमुळे आता टेस्टिंग सेंटरवर रांगांच रांगा दिसत आहेत. वैद्यकीय विभागाला कोरोना संदर्भात लागणारे साहित्य, औषधांचे वेळेतच नियोजन राज्य सरकारने केले असते, ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तुटवडा झाल्यावर जागे होणारे हे सरकार जनतेचे काय कामाचे. कामाला जाण्यासाठी, बाहेरगांवी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने, तपासणी केंद्रावर गर्दीचे प्रमाण मोठे असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. कोरोना कालावधीत राज्य सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे, स्थानिक पातळीवरील वैद्यकीय अधिकारी, महसूल, नगरपरिषद, पोलीस अधिकारी रात्रंदिवस एक करून आपापल्या पातळीवर नियोजन करत, कोरोनाशी लढाई करून नागरिकांना संरक्षण देण्याचे काम करत आहे.