शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 12:27 PM2021-02-05T12:27:43+5:302021-02-05T12:28:45+5:30

महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अशा शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Provide space for solid waste management in the city | शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देणार

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देणार

संगमनेर : वाढत्या शहरीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापनाची समस्या जटील होत चालली आहे. महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अशा शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्रीबाळासाहेब थोरात यांनी दिली.

राज्यात अनेक शहरांमध्ये घनकचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावरून स्थानिक प्रशासन व गावकरी यांच्यात अनेकदा गंभीर वादही झाले आहेत. काही नगरपालिकांकडे जागा उपलब्ध नाही. या सर्वांचा परिणाम घनकचरा व्यवस्थापनावर होत आहे. या समस्या राज्यातील अनेक नगरपालिका-नगर परिषदांना भेडसावत आहेत. परिणामी या नगरपालिकांच्या विकासासाठी शासनाचा निधी मिळवण्यातही अडचणी निर्माण होत होत्या.

   राज्यातील १५० हून जास्त नगरपरिषद-नगरपालिकांनी महासभेचा ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत शासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली होती. याचा विचार करून शासनाने आता घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या निर्णयामुळे नगरपालिका व नगरपरिषदांची मोठी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. असेही थोरात म्हणाले.

Web Title: Provide space for solid waste management in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.