प्रांताधिकाऱ्यांनी केल्या २५ बोटी नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 04:53 PM2021-03-12T16:53:58+5:302021-03-12T16:55:16+5:30
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू, मुरूमाचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
श्रीगोंदा : जिल्हाधिकारी यांनी गौण खनिज उत्खनन विरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिल्यानंतर श्रीगोंद्यात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू, मुरूमाचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
तहसीलदार प्रदीप पवार यांनी सोमवारी रात्री म्हसे व वडगाव शिंदोडी शिवारात छापा टाकून वाळू चोरांच्या अडीच कोटी किंमतीच्या २५ बोटी जिलेटीनचा स्फोट करून उद्ध्वस्त केल्या. श्रीगोंद्याच्या प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी बुधवारी रात्री वांगदरी शिवारातील घोड नदीपात्रात छाप टाकून एक जेसीबी व एक टॅक्टर पकडला. एक जेसीबी पळून गेला. हा जेसीबी कसा पळाला यावर अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी पळून गेला, असा खुलासा दाभाडे यांनी केला. गुरुवारी रात्री घारगाव शिवारात मुरुमाची चार वाहने पकडली.