परदेशी कुकला चोर समजून चोपले; पोलिसांनी गुन्हाही केला दाखल, सोशल मीडियावर युवकाने मांडली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 04:49 PM2020-09-06T16:49:50+5:302020-09-06T16:54:37+5:30
वाघापूर शिवारात शेतक-यांनी एका परप्रांतीय युवकाला शेतातील फ्लावर चोरल्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, हा युवक संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता त्यास पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सायंकाळपर्यंत ठाण्यात बसून ठेवले. दरम्यान, या युवकाने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकून आपली व्यथा मांडली.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतक-यांनी एका परदेशी युवकाला शेतातील फ्लावर चोरल्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, हा युवक संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता त्यास पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सायंकाळपर्यंत ठाण्यात बसून ठेवले. दरम्यान, या युवकाने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकून आपली व्यथा मांडली.
संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशाल कुमार केशी (रा.नेपाळ) असे या युवकाचे नाव आहे. तो घारगाव येथील हॉटेलात कुकचे काम करतो. पोलिसांनी सहकार्य न केल्याने त्याने आपला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने म्हटले आहे की, गणेश विसर्जनाच्या दिवशी मी संगमनेरला गेलो होतो. तेथे मित्रांसोबत पार्टी केली. येताना मित्रांनी मला वाघापूर शिवारात सोडून दिले. मी दारूच्या नशेत असल्याने भरकटलो. मी चोरी केली नाही. परंतु मला चोर समजून येथील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी त्याची मागणी आहे.
संगमनेर येथील वाघापूर शिवारातील देवगाव रोडलगत दिलीप नारायण शिंदे, सोमनाथ शिंदे यांची शेती आहे. शिंदे यांच्या शेतीतून २९ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या काळात आरोपी विशाल केशी याने फ्लॉवर चोरून नेले. २ सप्टेंबरला चोरी करीत असताना विशाल केशी हा शिंदे यांच्या ताब्यात सापडला. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दिलीप शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल कुमार केशी याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी हा घारगाव परिसरात एका हॉटेलमध्ये कूक आहे. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे, असे पोलीस नाईक विजय पवार यांनी सांगितले.